एस्. एस्.सी. निकाल -सतत १५ वर्षे एक विक्रम

मालवण तालुक्यातील प्रसिध्द इंग्रजी माध्यमाची , रोझरी इंग्लिश स्कूल शाळेने आपली १००% टक्क्यांची परंपरा कायम राखत सलग १५ वर्षे १००% निकाल लावत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रम केला आहे. या शैक्षणिक वर्षात एकूण ६५ विद्यार्थी परिक्षेत बसले होते त्यापैकी सर्वजण पास झालेत विशेष प्राविण्यात एकूण ४९ तर १५ विद्यार्थी ग्रेड एक व एक विद्यार्थी ग्रेड दोन मध्ये पास झाले असून कु. मेहेक रिझवान शेख (४८५) प्रथम तर कु. सायली राजेश मालवणकर (४८०) तर कु. जाधव परणिका दिपक (४७६) तृतीय क्रमांकाने पास झालेत.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बिशप ऑलविन बरेटो तसेच शाळेचे मुख्याध्यापक फा. रिचर्ड सालढाणा व सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *