पालकांमधल्या छुप्या प्रतिभेचं दर्शन घडवणारा सुंदर सोहळा

Rosary School

रोझरी इंग्लिश स्कुल मालवण आयोजित
Parents talent show 2018
Secret Superstar

प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सर्वोत्तम
शिक्षण देण्यासाठी आयुष्यात अनेक त्याग करत असतात, यासाठी कधी ते आपल्या करिअरवर पाणी सोडतात तर कधी आपल्या ठायी असलेल्या अंगभुत कलागुणांना मुठमाती देतात आणि याच कारणामुळे अनेक प्रतिभा संपन्न कलाकार आपल्या कलागुणांपासुन दुर जातात. हिच बाब मालवण येथिल रोझरी इंग्लिश स्कुलचे प्रयोगशिल मुख्याध्यापक फादर रिचर्ड साल्जाना यांनी ओळखुन आपल्या अभिनव संकल्पनेतुन आणि रोझरी प्रशालेच्या शिक्षक पालक संघ यांच्या सहकार्याने शाळेच्या पालकांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी मालवणात पहिल्यांदाच parents talent show – secret superstar या कार्यक्रमाचं आयोजन केलं .
पाश्चिमात्य देशात अनेक शाळा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात पण भारतात याची संख्या अत्यल्प आहे तर मालवण सारख्या शहरात नगण्य म्हणावं येवढं .त्यामुळे मालवणच्या इतिहासात अशा प्रकारच्या कार्यक्रमाची मुहुर्तमेठ रोझरी शाळेने रोवली असंच म्हणावं लागेल . खरंतर अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील प्रत्येक शाळेत होणं ही सध्या काळाची गरज आहे कारण अशा कार्यक्रमांमुळे पालकांची त्यांच्या पाल्यांच्या शाळेशी जोडली गेलेली नाळ अधिक घट्ट होते , पालक आणि पाल्यांमधला सुसंवाद वाढण्यास मदत होते जो हल्ली दिवसेंदिवस लुप्त होत चाललाय .
रोझरी शाळेने आयोजित केलेल्या या मालवण मधिल अभुतपुर्व सोहळ्याने पालकांना पुन्हा एकदा त्यांच्या तारुण्यात जायला भाग पाडलं .
या कार्यक्रमाची सुरूवात शुभदा पवार टिकम आणि सहकार्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली त्यानंतर सौ .पुजा करमळकर यांनी गायलेलं जरा होल्ले होल्ले साजना हे गाणं उपस्थितांना थेट कृष्ण-धवल चित्रपटांच्या जमान्यात घेवुन गेलं त्यातुन प्रेक्षक बाहेर येतायत तोच सौ . राधा केरकर यांनी सवार लु या गाण्यावर सादर केलेल्या आसामी लोककलेतील बिहु हा नृत्यप्रकार उपस्थितांची दाद मिळवुन गेला. या नंतर पडद्यामागुन बाहेर आला तो या कार्यक्रमातील खरा सिक्रेट सुपरस्टार मंगेश धुरी त्याने लता मंगेशकर आणि किशोरकुमार यांनी अजरामर केलेलं ‘ तेरे बिना जिंदगीसे कोई हे ‘ गाणं स्त्री आणि पुरूष या दोन्ही आवाजात सादर करत सर्वांनाच चकित केलं.
तर सानिका यादव यांनी सादर केलेली मालवणी बतावणी वातावरण हलकं फुलकं करून गेली.
सौ . हर्षाली सारंग यांनी सादर केलेलं एक , दोन , तीन या गाण्यावर सादर केलेलं नृत्य प्रेक्षणीय ठरलं,
सुशांत पवारने आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेलं तु पसंद है किसी औरकी , तुझे चाहता कोई और है, हे गाणं असफल प्रेमाची आठवण देवुन गेलं तर विजया मोरे यांनी रिमिक्स गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला ,
सुशांत करंगुटकर यांनी सादर केलेलं कल हो ना हो हे धीरगंभीर गाणं जीवन किती क्षणभंगुर आहे याची साक्ष देवुन गेलं ,अनुष्का चव्हाण यांनी सादर केलेल्या घुमर या नृत्यप्रकाराने राजस्थानी लोककलेचं दर्शन घडवलं तर सौ आर्या मुणगेकर यांनी पालकांना फिटनेस मंत्रा सांगुन फिटनेसचे फायदे पटवुन दिले व मरिना फर्नांडिस यांनी प्रेक्षकांना योगाच्या आसनांचे फायदे प्रात्यक्षिका सहित सांगीतले.
यानंतर प्रेक्षकांच्या चेहर्यावर हास्याचे कारंजे उडणं भागच होतं कारण रंगमंचावर सादर होत होतं सचिन टिकम , शुभदा टिकम , रूपेश नेवगी , सुशांत पवार अभिनित तुफान कॉमेडी आणि अजरामर नाटक ऑल दि बेस्ट या नाटकातील विनोदी प्रहसन हे प्रहसन संपताच श्री राजेंद्र तामगावकर यांनी जीना यहॉ , मरना यहाँ हे गाणं सादर केलं तर गौरव ओरसकर – गार्गी ओरसकर या रियल लाईफ मधल्या जोडिदारांनी मेरे हात में या फना चित्रपटातील गाण्यावर नृत्याद्वारे त्यांच्या नात्यात असलेली प्रेमाची घट्ट विण प्रेक्षकांना उलगडुन दाखवली हे नृत्य संपताच सौ आर्या मुणगेकर , हर्षाली सारंग आणि बबिता बिळवसकर यांनी एक समुहनृत्य सादर केलं तर सौ केतकी पाडगावकर यांनी आपल्या एकपात्री मधुन गृहिणीच्या दैनंदिन जीवनातील व्यथा वेदना मांडल्या , सौ अनुष्का चव्हाण , सौ . सोनल पालव , गीतांजली आचरेकर यांनी डान्स विद झुंबा सादर केलं .
यानंतर सौ, सुजाता देऊलकर-यादव यांनी आपल्या कवितेतुन पोलिस आणि पोलिस पत्नीच्या आयुष्यातील परवड मांडत प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेतला .
उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या सोहळ्याचं समर्पक सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी श्री सुशांत पवार आणि सौ. सुजाता देऊलकर-यादव यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. पालकांमध्ये लपलेल्या छुप्या प्रतिभेला नवसंजीवनी देणार्या या कार्यक्रमा बरोबरच भविष्यात पालक आणि त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांची सांगड घालणारा एखादा कार्यक्रम शाळेने आयोजित करावा कारण या मुळे मुलं आणि पालकांमधला दिवसेंदिवस वाढत जाणारा जनरेशन गँप कमी होवुन सुसंवाद वाढण्यास मदत होईल ” क्योंकी टँलेंट बहुत बडी चीज है बाबु ” !

गोविंद (बंटी ) केरकर
तारकर्ली
9819521702

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *