मालवण तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण विजेता

Cricket Team

मालवण त्रिंंबक येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षे खालील गटात रोझरी हायस्कूलच्या संंघाने सेमीफायनल मध्ये वडाचापाट हायस्कूलचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना रोझरी इंग्लिश स्कूल आणि टोपिवाला हायस्कूल मालवण या संघात झाला. टोपिवाला हायस्कूलचा पराभव करीत रोझरी इंग्लिश स्कूलने आपला संघ जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरविला.

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कुल मालवणचे वर्चस्व

Basket Boll Team

मा. जिल्हा क्रिडा कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित बास्केटबॉल स्पर्धा रोझरी इंग्लिश स्कुलच्या मैदानात दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी पार पडली.

  • १८ वर्षे मुलींच्या गटात कुडाळकर हायस्कूलच्या संघाचा पराभव करत विजेते पद रोझरी हायस्कूलने प्राप्त केले.
  • १७ वर्षे मुलांच्या गटात रोझरी हायस्कूल मालवण यांंनी सैनिक स्कुल आंबोली यांंच्या संघावर एकतर्फी विजय प्राप्त केला.
  • १७ वर्षे मुलींच्या संंघाने कुडाळकर हायस्कूलचा पराभव करत प्रथम क्र. मिळविला.