Other Achievemets

बीडीएस परीक्षेत रोझरी इंग्लिश स्कूलचा अद्वैत नाईक देशात २८ वा तर सिंधुदुर्गात प्रथम

 

rosary english school

 

मालवण : जानेवारी महिन्यात झालेल्या बीडीएस (ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप) परीक्षेत रोझरी इंग्लिश स्कूल च्या मुलांनी नेत्रदीपक यश मिळवले. प्रशालेतील इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी अद्वैत निलेश नाईक याने संपूर्ण भारतात २८ वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या व्यतिरिक्त स्वरा शंकर मोर्जे (इयत्ता पहिली ) ही देशात ८५ वी तर स्वरा प्रसन्नकुमार मयेकर (इयत्ता दुसरी) हिने ८० वा क्रमांक मिळवला. स्वर्णी वायंगणकर (इयत्ता पहिली ), अनुष्का चौगुले, वेदा नारकर (इयत्ता दूसरी ), जुई चोपडे,  प्रत्युश शेट्टीगार (इयत्ता तिसरी ) यांनी कांस्य पदक तर गौरवी कांबळी, रुद्र वंजारी (इयत्ता दुसरी), स्पंदना गायकवाड (इयत्ता तिसरी ) यांनी रजत पदक प्राप्त केले. प्रशालेतून या परीक्षेस प्रविष्ट झालेले इतर विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था व शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाना तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.